Talegaon : डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधाचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – आंबी तळेगाव येथील डॉ. डी. वाय. पाटील ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली.

तळेगाव आंबी येथे ही परिषद दि. 26 आणि 27 एप्रिल या दरम्यान आयोजित केली होती. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन एसव्हीएनआयटीचे प्रोफेसर डॉ. आर. व्ही. राव आणि अॅम्टी युनिर्व्हसिटीचे संचालक डॉ. श्रीकंत च-हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एल. बी. कांबळे यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षणातील शोधनिबंधाचे महत्व प्रतिपादन केले.

  • या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरातून उच्च दर्जाचे 122 शोधनिबंध सादर करण्यात आले. काही शोधनिबंध ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने सादर करण्यात आले. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉक्टर किरण गावडे यांनी या परिषदेची माहिती दिली यावेळी प्राचार्य डॉ. राजेश खेरडे हेही उपस्थित होते. शशिकांत खराटे यांनी उपस्थितांना शोधनिबंध प्रकाशित कसे करावेत? याबाबत मार्गदर्शन केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी वाय पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ, विजय पाटील संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी शिवानी विजय पाटील, बबनराव गायकवाड आणि रजिस्टर अशोक पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.