Talegaon : ओझर्डे गावातील अवैध दारुभट्ट्यांवर छापा; 18 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – ओझर्डे गावाजवळ कंजारवस्ती येथे अवैध दारूभट्ट्यांवर तळेगाव पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी 1 लाख 24 हजार रुपयांचा ऐवज नष्ट केला. ही कारवाई बुधवारी (दि. 13) करण्यात आली. यामध्ये एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

विजय काळू राठोड, रजनी विजय राठोड, यशोदास विजय राठोड, सिमी यशोदास राठोड, मनीषा अनिविवेक राठोड, अनिविवेक विजय राठोड, तुलसी काळू राठोड, सत्यवती तुलसी राठोड, आकाश सुनील राजपूत, सपना आकाश राजपूत, प्रियांका नंदू राजपूत, नंदू आकाश राजपूत, राहुल बाळू राठोड, राजश्री राहुल राठोड, सुरंग शामराव राठोड, शरणशक्ती उर्फ सुजाता सुरज राठोड, राजू शामराव राठोड, सुद्धा राजू राठोड (सर्व रा. कंजारभाटवस्ती, ओझर्डे, ता. मावळ) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर्डेजवळ कंजारभाटवस्ती येथे घरात आणि आजूबाजूच्या झाडाझुडूपात हातभट्टीची दारू तयार करण्याच्या भट्ट्या सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दारूभट्ट्या उध्वस्त केल्या. ही कारवाई सुमारे दोन तास चालली.

पोलिसांनी 850 लिटर तयार दारू, 145 मोकळे कॅन्ड, 6 हजार 200 लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन असा एकूण 1 लाख 70 हजार 650 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला त्यातील सव्वा लाखांचे कच्चे रसायन पोलिसांनी जागेवर नष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.