Talegaon Dabhade : भाजपच्या शहराध्यक्षपदी रवींद्र माने यांची निवड

महेंद्र रामचंद्र पळसे यांची कार्याध्यक्षपदी आणि वैभव बाळासाहेब कोतुळकर यांची प्रभारीपदी निवड

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या मावळ तालुक्याचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदाची सूत्रं रविंद्र बाळासाहेब माने यांच्याकडे सोपवण्यात आली. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

यावेळी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, संघटन पर्व निवडणूक अधिकारी डॉ ताराचंद कराळे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत शेटे, नगराध्यक्ष ॲड रविंद्रनाथ दाभाडे, उपनगराध्यक्ष शामराव आप्पा दाभाडे, माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, उपनगराध्यक्ष गिरीष खेर, नगरसेवक इंदर ओसवाल, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ज्योती जाधव, ज्येष्ठ नेत्या रजनी ठाकूर,सभागृह नेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे, अर्थ नियोजन समिती सभापती शोभा भेगडे, महिला बालकल्याण सभापती काजल प्रदिप गटे,नगरसेवक सुरेश दाभाडे यांनी प्रास्तविक केले. नगरसेविका संध्या गणेश भेगडे, नगरसेविका विभावरी दाभाडे, नगरसेविका प्राची आशुतोष हेंद्रे, महिला मोर्चा गावभाग अध्यक्षा अलका भास्कर,स्टेशन भाग अध्यक्षा अंजली जोगळेकर,कार्याध्यक्षा तनुजा दाभाडे, चारुशीला काटे भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे, सौरभ दाभाडे, प्रमुख पदाधिकारी मान्यवरांसह पक्षाचे आजी माजी नगरसेवक- नगरसेविका,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षपदी निवड झालेले रविंद्र बाळासाहेब माने यांनी या आधी मावळ तालुका विस्तारक पदाची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी सांभाळली आहे. कार्यकाळात त्यांनी अभ्यासू व त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले होते.तालुक्यातील अनेक विविध सामाजिक संस्थांवर त्या काम करत आहेत. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

मी शहर अध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देणार, तसेच लोकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी शहर अध्यक्ष या नात्याने मी आणि आमची संघटना कटिबद्ध असल्याचे ही माने यांनी सांगितले. पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा येत्या काळात प्रयत्न राहील, असे निवडीनंतर रविंद्र बाळासाहेब माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.