Talegaon : पवना पुनर्वसनाचा अहवाल त्वरित शासनाकडे सादर करावा-आमदार संजय बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – पवना धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने पुनर्वसन लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देऊन भेट घेतली. पवना धरणग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. यामुळे अनेक मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत.

यासाठी शासनाने लवकरात लवकर पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे , यासाठी धरण परिसरातील उर्वरित जमिनींची फेरमोजणी करावी , धरणग्रस्तांच्या वारसांना नोकऱ्या द्याव्यात , तसेच धरणग्रस्तांच्या उपजिवेकेचे साधन बनलेल्या कृषी,पर्यटन व्यावसायाला अधिकृतपणे परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे .

या वेळी पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, उपसभापती शांताराम कदम,सचिव दत्तात्रय ठाकर, सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर उपाध्यक्ष दशरथ शिर्के, बबनराव कालेकर, जिल्हा पर्यावरण समिती सदस्य सचिन मोहिते, सुधीर घरदाळे, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.