Talegaon : माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक (Talegaon) यांनी सोमवारी (दि.27) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिसांना सुरक्षेची मागणी करणारे निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे येथील सर्व्हे क्रमांक 449 येथे कृष्णा आकार सोसायटीचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याची माहिती मिळाली असता प्रदिप नाईक यांनी मित्र किरण गवळी यांना माहिती दिली.

याची माहिती मिळताच सोसायटीने मिटींग घेत सोसायटीचे सभासद मिलींद काळे, प्रसन्न आंधळे, मारुती धायगुडे, आणि एक महिला यांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. तसेच, नाईक व त्यांच्या मित्राला बघून घेऊ, तुम्ही सोसायटीमध्ये कसे येता, प्रकरण बाहेर कसे काढता? अशी दमदाटी केली.

मिटिंगबद्दल ठरावाची माहिती फोनवरून आम्हाला कळवली गेली. यावरून आमच्या जिवीताला धोका (Talegaon) असून योग्य तो न्याय करत संरक्षण द्यावे अशी मागणी प्रदिप नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.