Talegaon Road Work: रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध

एमपीसी न्यूज – शिवाजी चौक तळेगाव ते कातवी या मार्गावरील (Talegaon Road Work) रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होत आहेत. मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने हे अर्धवट काम लवकर पूर्ण करावे, तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून नागरिकांच्या सह्यांचा फ्लेक्स लावण्यात येणार आहे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन नागरीक मंचाचे अध्यक्ष वसंत भापकर, सचिव निरंजन जहागीरदार, कार्याध्यक्ष मिलिंद देशपांडे आदींनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे दिले आहे.

Mumbai-Pune Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात

नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 1 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कातवी रोड कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुमारे दोन महिने अर्धवट अवस्थेत असून यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले असून प्रशासनास वारंवार तोंडी व लेखी विनंती करून देखील आपणाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

Bhosari News : इंद्रायणीनगरमध्ये पाणी टाकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा माजी नगरसेवकाचा दावा

या विषयीचा निषेध म्हणून नागरिकांच्या सह्याचा फ्लेक्स गोळवलकर गुरुजी मैदानावर लावण्यात येणार असून प्रशासनाचा जाहीर निषेध पुढील दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, दोन दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंतीही नागरिक मंच तळेगाव दाभाडे (Talegaon Road Work) यांच्याकडून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.