Talegaon Crime News : आंबी वारंगवाडीत 5.30 लाखाची घरफोडी, सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – आंबी वारंगवाडी, मावळ येथे 5 लाख 30 हजार रूपयांची घरफोडी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी 10 तोळे वजनाचे प्लेन बिस्कीट आणि रोख रक्कम चोरी केली आहे. 5 नोव्हें. ते 12 नोव्हें. या कालावधीत हा प्रकार घडला.

यशवंत बळवंत गद्रे (वय 72, रा. आंबी वारंगवाडी, मावळ ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी दाराचा कडी, कोयंडा तोडू घरात प्रवेश करत, घरातील 10 तोळे वजनाचे प्लेन बिस्कीट आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.