Talegaon : संग्राम काकडे यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संग्राम बाळासाहेब काकडे यांनी आज (बुधवारी, दि  29) आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे सुपूर्द केला. स्वतःच्या मर्जीने आणि राजीखुषीने पदाचा राजीनामा देत असल्याचे काकडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तळेगाव नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून काकडे हे प्रभाग क्रमांक तीन ‘ब’ मधून निवड आलेले आहेत. काकडे उपनगराध्यक्ष असताना तळेगाव नगरपरिषदेने जैवविविधता उद्यान, पाणी योजना आणि भुयारी गटारांचे प्रश्न मार्गी लागले आहेत.

काकडे यांना 20 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. काकडे यांचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मंजुर केला आहे. स्वतःच्या मर्जीने व राजीखुषीने उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे काकडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त कालावधी देऊन पक्षश्रेष्ठींनी काम करण्याची संधी दिल्याबद्दल श्रेष्ठींचे आभार मानतो, असे काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.