Talegaon : उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी उर्फ आण्णासाहेब दाभाडे यांचा गौरव

एमपीसी न्यूज – ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी’च्या 12 व्या कार्यकारिणीची बैठक येथील एमराल्ड सभागृहामध्ये पार पडली. गरजू महिलांना कामधेनू वरदान ठरणारा गोमाता प्रकल्प आणि ग्रामीण भागातील गरजू विदयार्थांना उभारी देणारा नियोजित हॅपी स्कुल प्रकल्प यावेळी प्रांतपाल रवी धोत्रे यांनी जाहीर केला.

गोरगरीब गरजूंना अडीअडचणीत साथ देणारे आणि वर्षानुवर्षे मोफत अंत्यविधीचे साहीत्य उपलब्ध करुन देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी उर्फ आण्णासाहेब दाभाडे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल याप्रसंगी रोटरी व्होकेशनल सर्व्हीस अवाॅर्डने गौरवण्यात आले.

रोटरीचे संचालक सुधीर आपटे,सहायक प्रांतपाल डाॅ.महेश कुदळे, नगरसेविका वैशाली दाभाडे,रोटरी एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे,शंकर हादीमनी,सुनिल भोंगाडे,आशिष खांडगे,समीर दाभाडे आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

अध्यक्ष गणेश काकडे यांनी अहवाल वाचन केले.अनिल धर्माधिकारी यांनी पुरस्कारार्थी परिचय करुन दिला. सचिव दशरथ जांभुळकर यांनी सूंत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुमती निलवे यांनी आभारप्रदर्शन केले. विन्सेंट सालेर,राहुल खळदे,सचिन कोळवणकर,हिरामण बोत्रे,अजय पाटील,मच्छींद्र घोजगे आणि रोटरी सदस्यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.