Talegaon : ‘श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर’ शाळेचा 10 वी सीबीएससीचा निकाल लागला 100 टक्के

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील  श्री पार्श्व प्रज्ञालय जैन श्र्वेतांबर तीर्थ पेढी संचालित “श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर” या शाळेचा 10 सीबीएससीचा निकाल यंदा देखील 100 टक्के लागला(Talegaon) आहे. या शाळेचा सलग 20 वर्ष शैक्षणिक वारसा असून आजपर्यंत इयत्ता 10 वीच्या 18 व्या बॅचने घवघवीत यश संपादन केले आहे.

 

प्रथम क्रमांक-मंथन राजेश जैन 96.00 टक्के, दुसरा क्रमांक-वेदांत विक्रांत साकला 90.20 टक्के, तिसरा क्रमांक-हीत विनयकुमार शहा 86.40 टक्के, आर.अदिथ जैन85.40 टक्के, पार्श्व विजय मेहता 81.60 टक्के, जीनित दिपेश जैन 79.80 टक्के आदींनी यश संपादन केले. या यशासाठी सर्व विदयार्थी, पालक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य(Talegaon) लाभले आहे.

 

येथे मुख्यतः विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उत्तम शैक्षणिक प्रगती, संस्कार आणि जीवनमूल्ये यांच्या आधारे व्यक्तिमत्व विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिकविले जाते. उत्तम भोजन व निवास व्यवस्था असलेल्या या शाळेत विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत विदयार्थी आपली आवडही जपत असतात.गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब करत इतर मैदानी खेळा व्यतिरिक्त योगासने,  तायक्वांडो,नृत्य, नाट्य, गायन,वादन इत्यादी कलागुणांचा विकास ही साधण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील असते. अप्रत्यक्षरीत्या मोबाईल, टीव्ही सारख्या इतर प्रलोभानांपासून दूर राहण्यासाठी इथल्या वसतिगृहातील शिस्त खूप महत्वाचे कार्य करत आहे.

 

इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 7 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.दीपक शहा, विश्वस्त संतोष पटवा, सुभाष राठोड, जितेंद्र शहा आणि मुख्याध्यापिका पल्लवी शानभाग यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.