Talegaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमास तळेगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Talegaon) यांच्या कार्यक्रमाचा 100 वा भाग नुकताच संपन्न झाला. या भागात मोदी यांनी विविध विषयांवर संवाद साधला. या कार्यक्रमाचे तळेगाव भाजपच्या वतीने 10 शक्ती केंद्रांवर संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तळेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी विविध शक्ती केंद्र स्थानी माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, राजु जांभूळकर, उमाकांत कुलकर्णी, भाजयुमो मावळ तालुका अध्यक्ष संदिप काकडे, सुधाकर धनशेट्टी, नगरसेवक अरुण भेगडे, नगरसेविका शोभा भेगडे, संध्या भेगडे, कल्पना भोपळे हे प्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून अज्ञात कला-कौशल्य, सामाजिक कार्य, पर्यावरण, संशोधन, सांस्कृतिक विविधता अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे. विविध विषय प्रकाशात आणून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली आहे. केवळ सरकार नाही तर देशातील जनतेच्या सहभागातूनच देशाची सर्वांगीण प्रगती साधली जावू शकते. एक भारत श्रेष्ठ भारत घडविण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास आवश्यक असल्याचे सातत्याने मोदींनी सांगितले आहे.

Pune : ऑनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदी करत कंपनीची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

तळेगाव येथे झालेल्या कार्यक्रमासाठी 270 जणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शक्ती (Talegaon) केंद्र प्रमुख नितीन भगवान पोटे, विनायक गंगाराम भेगडे, हिम्मतभाई भगवान पुरोहित, अनिल वसंतराव वेदपाठक, अनिल गोपाळ शेलार, अमेय सुरेश झेंड, केदार गोरख भेगडे, संतोष शांताराम परदेशी, सूरज बाळकृष्ण सातकर, तनुजा आनंद भेगडे, सरचिटणीस शोभा परदेशी, रजनी ठाकूर आणि सर्व बूथ अध्यक्ष, शहर कार्यकारिणी, मोर्चा आघाडी अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.