Talegaon : राज्यमंत्री भेगडे व खासदार बारणे यांच्या हस्ते रविवारी विविध विकासकामांचे उद्घाटन

एमपीसी  न्यूज – राज्यमंत्री बाळा भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन भाजप कार्यालयासमोर मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथे करण्यात येणार आहे.

रविवारी दि. 29 जूनला सकाळी नऊ वाजता श्रीसंत कैकाडी महाराज समाज मंदिर उद्घाटन, जैवविविधता उद्यान यशवंत नगर,  रेल्वे अंडरपास लोकार्पण, शॉपिंग कॉम्प्लेक्स उद्घाटन, भूयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, शॉपिंग कॉम्प्लेक्स उद्घाटन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.