Talegaon Station : सरस्वती विद्या मंदिरमध्ये ‘भूगोल दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भूगोल दिनानिमित्त शिक्षिका छाया सांगळे यांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे प्रकल्प तयार करण्यास सांगितले होते. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यात ढगांचे प्रकार, वणवा लागल्यानंतर होणारी हानी, प्रदूषणमुक्त शहर, दगडांचे प्रकार, सूर्यमाला, भूकंप, मातीचे प्रकार, ग्रहण स्तिथी, चंद्रकला आदी विविध भौगोलिक संकल्पनावर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते.

या प्रदर्शनास संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, सदस्य विश्वास देशपांडे, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्या. रेखा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि शिक्षिका सांगळे यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.