Talegaon Station : डी.वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

एमपीसी न्यूज – आंबी येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर आंबी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानने महाविद्यालयाचा प्रथम दीक्षांत समारंभ दि. 18 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला.

या समारंभास संस्थेच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा शिवानी पाटील तसेच जगविख्यात आर्किटेक्ट अनु मृदुल, त्यांच्या पत्नी शिल्पा मृदुल व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उमा जाधव तसेच डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमधील इतर सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. महाविद्यालयात प्रथमच दीक्षांत समारंभ असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

समारंभ उत्कृष्टरित्या पार पाडण्यात प्राचार्य डॉ. उमा जाधव, प्रशासकीय अध्यक्ष भवानराव गायकवाड आणि रजिस्ट्रार अशोक पाटील तसेच महाविद्यालयाचे सहकारी शिक्षक आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.