Talegaon Station : प्राथमिक विद्यालयातील शिक्षक सूर्यकांत खरात यांनी मिळवली शिक्षणशास्त्रात पीएच.डी.

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळातील संत गाडगेमहाराज प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १०, खंडाळा येथे कार्यरत असणारे पदवीधर शिक्षक डॉ. सूर्यकांत नामदेव खरात यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत भारतीय शिक्षण संस्था पुणे (आय.आय.ई.) या अभ्यास केंद्रातून आंतरविद्याशाखेअंतर्गत शिक्षणशास्त्र या विषयातून पीएच.डी. अंतर्गत आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा विषय “ चर्मकार समाजाची समता, प्रतिष्ठा व विकास यावर शिक्षणाचा झालेला परिणाम“ असा होता.

संशोधनाचा अभ्यास करताना त्यांनी पुणे शहरातील स्वातंत्र्यानंतरच्या चर्मकार समाजाचा सखोल अभ्यास करून सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या संशोधनासाठी भारतीय शिक्षण संस्थेतील प्रा. डॉ.मर्झबान जाल यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर संस्थेतील प्रा. डॉ.ज्योती बावणे यांनीही संशोधनासाठी मार्गदर्शन केले. संशोधन कार्य करताना अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथील सहा.प्रा. डॉ. संदीप गाडेकर आणि रिसर्च फेलो डॉ.दीपक गायकवाड , डॉ. किशोर जगताप, डॉ.अनिता धायगुडे यांची मदत झाली.

लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, केंद्र समन्वयक प्रदीप गवई व शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा खिरे, स्वाभिमानी चर्मकार संघाचे गोरख ननावरे, बाळासाहेब बनसोडे, सुभाष गायकवाड या सर्वानी अभिनंदन केले.

पुणे शहर स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष किशोर पवार, सचिव जयदेव इसावे, सुरेश पोटे, राजाभाऊ पोटे आणि सर्व नातेवाईक व कुटुंबातील सहचारिणी वैशाली सूर्यकांत खरात यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

त्यांच्या या यशाबद्दल लोणावळा नगरपरिषद व मावळ तालुक्यातील सर्व शाळांतील शिक्षकामधून व समाजातील सर्व स्तरामधून त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.