Talegaon Station : काकड आरती सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्ट जोशीवाडी, तळेगाव स्टेशन येथे कार्तिक स्नान सोहळ्यानिमित्त कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा दररोज पहाटे 5 ते सकाळी 7.30 या कालावधीत महिनाभर चालू असलेल्या काकड आरती सोहळ्याचा सांगता समारंभ मंगळवारी (दि 12 नोव्हेंबर 2019) भक्तिमय वातावरणात पार पडला.

श्री विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या अध्यक्षा व तळेगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे आणि सहपरिवार यांचे हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पहाटे 5.30 वाजता करण्यात आली. सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत दिंडी प्रदिक्षणा झाली. त्यानंतर ह. भ.प. दिलीपमहाराज खेंगऱे यांचे काल्याचं कीर्तन 10.30 ते 12.30 या कालावधीत झाले. या कीर्तनात दिलीप महाराज खेंगऱे यांनी काकडयाचे आणि आध्यत्मिक महत्व विविध दृष्टांत देऊन पटवून दिले.

कीर्तनासाठी गायनाचार्य म्हणून ह.भ.प. भाऊसाहेब मापारी व श्री बुरुडे गुरुजी यांनी साथ दिली तसेच मृदूंगाची साथ ह.भ.प. कुणाल विजय वाघमारे व ह.भ.प. यश दिलीप खेंगऱे यांनी दिली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या सोहळ्यास तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे विद्यमान नागसेवक गणेशजी काकडे, श्री रविंद्रजी आवारे तसेच विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे सर्वेसर्वा किशोर आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्तिक स्नान सोहळ्यसाठी महिनाभर श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ इंद्रायणी कॉलनी या मंडळाच्या सर्व सभासदानी भजनाची सेवा पार पडली. त्यात मृदूंगमनी म्हणून ह. भ. प. दिलीप देशमुख, ह.भ.प. बाळासाहेब गरुड, ह.भ. प. कुणाल वाघमारे, ह.भ.प. गजानन घोगरे, यांनी साथ दिली तर विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे सचिव ह.भ.प. विजय वाघमारे व विश्वस्त ह.भ.प मोहन कडू यांनी गायन व मृदूंग वादनाची साथ दिली.

तसेच श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळाचे सभासद सुप्रसिद्ध कीर्तनकार भ प निवृत्ती महाराज हुले, ह.भ.प.महादू महाराज शिंदे , अर्जुन महाराज काकडे, मोरेश्वर महाराज केदारी,ज्ञानेश्वर महाराज साठे, अनिल महाराज कारंडे, ज्ञानेश्वर महाराज घोगरे, गोरख महाराज घोडके, रविंद्र महाराज माने, दत्तात्रय महाराज देशमुख विठ्ठल महाराज पारगे यांनी गायनाची साथ दिली.

विणेकरी म्हणून ह. भ.प. घोगरे बाबा यांनी अखंड महिनाभर सेवा पार पाडली. तसेच महिला भगिनीमध्ये ह.भ.प. मनीषा माने, अनुराधा पवार, उषा मुस्कवाड, अश्विनी घोगरे, केदारी मावशी, केकाण मावशी व ह.भ. प. लता हुले, सायली कडू यांनीही महिनाभर आपल्या घरातील सर्व कामे सांभाळून न चुकता दररोज पहाटे 5.00 वाजता हजर राहून गायनाची उत्कृष्ट साथ दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा सुलोचना आवारे, श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा ट्रस्टचे सचिव ह.भ.प. विजय वाघमारे व विशवस्त ह.भ.प.मोहन कडू यांनी केले तसेच श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथील सर्व सभासदानी त्यांना सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.