Talegaon Station : ‘झूम मिटींग ॲप’द्वारे एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी गिरवताहेत ‘ऑनलाइन’धडे; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’चे नियोजन

एमपीसी न्यूज – कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाता विळखा घातला आहे. त्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाकडाऊन केले. ऐन परीक्षेचा काळ तोंडावर आला असताना राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, एम.आय.टी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स तळेगावने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’चे नियोजन करत ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा वापर सुरू करूनमुलांना शिक्षण देत कॉलेज सुरू ठेवले आहे.

याबाबत कॉलेजचे प्राचार्य विनोद साळवे यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि शिक्षकांना या उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर एप्रिल महिन्याचे वेळापत्रक बनवण्यात आले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ४ एप्रिलपासून ऑनलाइन वर्ग नियोजनानुसार सुरु झाले आहेत. व्हिडिओं, ऑडिओद्वारे शिकविण्यासाठी गुगल, झूम अपचा वापर करीत आहेत. त्यामुळे मुलांचा अभ्यास नियमित सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद घडू लागला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी झूम मिटिंग या अँप्लिकेशनद्वारे एकत्र येतात आणि दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण सकाळी नऊ ते बारा या वेळेत शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. झूम मीटिंग अँप्लिकेशन वापरून मुलांना घरी बसून देखील फळ्यावर लिहिलेले सर्व काही घरच्या मोबाईल, कॉम्प्युटरवर दिसून येते.

विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांमधील सर्व विषयांची माहिती दिली जाते.तसेच मनोरंजन म्हणून विद्यार्थी सध्या काय करताहेत याचीदेखील माहिती शिक्षक या अॅपद्वारे येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणाप्रमाणे शिक्षण मिळत असल्यामुळे कॉलेज बंद असतानादेखील विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही.

याव्यतिरिक्त अभ्यासाबरोबरच काही चित्रपट व नाटक यासंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत असून त्यावर चर्चा आणि चांगली पुस्तके विद्यार्थ्यांनी या कालखंडात वाचावी त्यातून वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक परिचय हा उपक्रम ही लवकरच सुरू करणार असल्याचे प्राचार्य विनोद साळवे यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी लागणाऱ्या संपूर्ण तांत्रिक बाबी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषय शिकविणाऱ्या शिक्षिका फरहाना अल्मेल समर्थपणे सांभाळत आहेत. याचबरोबर वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक आपल्या जबाबदार्‍या सांभाळत सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटून उपयुक्त मटेरियल तयार करत आहेत.

  • घरे बनली ज्ञानमंदिरे
    ‘लर्न फ्रॉम होम’ या अभिनव संकल्पनेतून कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक घरी बसूनच ज्ञानदानाचे काम करत आहेत. ही अभिनव संकल्पना विद्यार्थ्यानादेखील रुचत असून विद्यार्थी आवडीने त्यात भाग घेत आहेत. या ऑनलाइन शिक्षण प्रणालीत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे घर हे आता ज्ञानमंदिर बनले आहे. लॉकडाऊनमध्ये घरी सुरक्षित राहून शिक्षणात खंड पडू न देणारा व शिक्षणास उपयुक्त अशा शैक्षणिक उपक्रमाचे पालक कौतुक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.