Talegaon Station : लॉकडाऊनमुळे तळेगाव स्टेशन परिसरात शांतता; नागरिकांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – कोरोना पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.9)आणि शुक्रवार (दि.10) या दिवशी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पुकारलेला लॉकडाऊनमुळे गुरुवारी (दि.09)) परिसर कडकडीत बंद होता. तर तळेगाव स्टेशन परिसरात मेडिकल दुकाने, दवाखाने, विज उपकेंद्र आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळून सगळीकडे निर्मनुष्य रस्ते आणि परिसर अशी परिस्थिती होती. तर, या दोन दिवसात तळेगाव दाभाडे परिसरात पोलिस बंदोबस्त कडक ठेऊन पोलीस बांधवांनीही उत्तम कामगिरी बजावली आहे.

रस्त्यावर अत्यावश्यक सेवा संबंधित वाहने आणि त्या संबंधित नागरिक वगळून काहीही दिसत नव्हते.तळेगाव स्टेशन परिसरातील जनरल हॉस्पिटलचे आवारात भाजी विक्रेते, वितरक सफाई कामगार, औषध विक्रेते यांची कोरोना पार्श्वभूमीवर मेडीकल तपासणी केली जात होती. तपासणी करुन घेणारे दोन व्यक्तीमध्ये योग्य अंतर ठेवून शिस्तबद्ध होत होती.

बुधवार (दि 8) 100 जणांची, गुरुवार (दि.०९) 227 जणांची, आणि शुक्रवारी (दि.१०) 306 जणांची अशी एकूण तीन दिवसांत 633 लोकांची तपासणी झाली. उर्वरित लोकांची तपासणी राहीली त्यांची पुढील दिवसात तपासणी केली जाणार आहे, असे तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रवीण कानडे यांनी सांगितले.

विरजी खिमजी गॅस एजन्सी कंपनीच्या 30 कर्मचाऱ्यांनी तळेगाव दाभाडे येथील गरवारे ब्लड बँकेत रक्तदान करून गुरूवार (दि 9) सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हेच जीवनदान आहे. हे जाणून ह्या वेळी कोणीही बाहेर पडत नसतानाही कर्मचा-यानी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.