Talegaon Station : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बांधला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा

एमपीसी न्यूज – तळेगांव स्टेशन येथील कान्हे (ता. मावळ) याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे श्रमदान करून कान्हे गावाजवळील ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला.

यावेळी शिबिरातील 75 विद्यार्थी-विद्यार्थिनीने सहभाग नोंदवला. गावचे सरपंच विजय सातकर, पोलीस पाटील शांताराम सातकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी रमजान वरूनकर, भूषण बिरादार तसेच अरिहंत महाविद्यालयातील प्राध्यापक मंगेश ताकपिरे, शैलेश घाणेकर, प्राध्यापिका डॉ कांचन शिंदे, रूपाली मेमाने इत्यादींनी यावेळी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.