Talegaon Station : व्यवसायात छोट्या गोष्टीचा अनुभव घेतला तरच यशस्वी व्हाल -आशिष खांडगे

एमपीसी न्यूज – व्यवसाय करताना छोट्या छोट्या गोष्टीचा अनुभव घेतला तरच निश्चित यशस्वी व्हाल” असे प्रतिपादन तळेगाव येथील युवा यशस्वी उद्योजक आशिष खांडगे यांनी केले.

तळेगाव स्टेशन येथील रुडसेट संस्था व खादी ग्रामउद्योग आयोग आयोजित 10 दिवसाच्या प्रधानमंत्री रोजगार विकास कार्यक्रमाच्या (PMEGP) निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रा.डॉ. संदीप गाडेकर, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, उद्योजक आशिष खांडगे तसेच रुडसेट संचालक जयंत घोंगडे आदी उपस्थित होते.

या ळी 10 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप काही नवीन शिकून जीवनात यश कसे मिळवावे? हे अनुभव कथन करताना श्रीकांत वाल्हेकर आणि भाग्यश्री तरटे यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संदीप गाडेकर यांनी शुभेच्छा देऊन म्हणाले, हा निरोप समारंभ नसून सदिच्छा समारंभ आहे. स्वतः वर विश्वास ठेवला तर एक यशस्वी उद्योजक निश्चित घडेल, असे सांगून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रुडसेट संचालक जयंत घोंगडे यांनी बँकेने प्रथम मदत केल्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी खूप मोठी मदत झाली आहे त्यासाठी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन, डिजिटल माध्यमाचा उपयोग करून व्यवसाय वाढवावा. संस्था कायम तुमच्यासोबत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशिक्षक हरिच बावचे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन योगिता गरुड, दिनेश निळकंठ व रवी घोजगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.