Talegaon Crime News : कंपनीच्या स्टोअर रूममधून पाउण लाखांचा माल चोरीला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या स्टोअर रूममधून तीन चोरट्यांनी 77 हजार 645 रुपयांचे वेलनट चोरून नेले. ही घटना एक ते तीन ऑक्टोबर या कालावधीत आंबी येथील मास्क पॉलीमर कंपनीमध्ये घडली. पोलिसांनी चोरी करणा-या तिघांना अटक केली आहे.

राजू केवल सिंग (वय 35, रा. वडगाव मावळ), अमरदीप म्हेत्रे, अमरीश पाकनिर (दोघे रा. शेलारवाडी, सोमाटणे फाटा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राघवेंद्र सुधाकर कुलकर्णी (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी आंबी येथील मास्क पॉलीमर कंपनीमध्ये नोकरी करतात. याचं कंपनीत आरोपी राजू सिंग हा कामगार आहे. त्याने कंपनीच्या स्टोअर रूममधून 77 हजार 645 रुपयांचे पितळी धातूचे एक लाख 28 हजार 500 वेलनट चोरून नेले.

चोरलेले वेलनट राजू याने आरोपी अमरदीप आणि अमरीश यांच्याकडे दिले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.