Talegaon : ‘आढले खुर्द’च्या सरपंचपदी स्वाती चांदेकर बिनविरोध

Swati Chandekar unopposed as Sarpanch of 'Aadhale Khurd'

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती बाळासाहेब चांदेकर यांची बिनविरोध निवड झाली.

सरपंच आशा जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी संगिता शेरकर यांच्या अध्यक्षेतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये निर्धारित वेळेत चांदेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदासाठी निवड घोषीत करण्यात आली. सहाय्यक म्हणुन ग्रामसेविका कांचन मारकड यांनी काम पाहिले.

यावेळी मावळत्या सरपंच आशा जगदाळे, उपसरपंच गोरख पशाले, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव येवले, संजय भोईर, विकास भालेसेन, अलका येवले, स्वाती भोईर, कविता घोटकुले, माजी सरपंच दत्तात्रय चांदेकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मोहन येवले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे, माजी सरपंच सतिश येवले, भाऊसाहेब भोईर, दिनेश कदम, वसंत चांदेकर, राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे अध्यक्ष संजय शेडगे, हिरामण येवले आदी उपस्थित होते .

निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.