BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये महिला कामगारांसोबत पोलिसांची सुरक्षा बैठक

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी परिसरातील मास्क कंपनीतील महिला कामगारांसोबत पोलिसांनी सुरक्षा बैठक घेतली. पुढील आठ दिवस दररोज ही बैठक घेण्यात येणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ ऊडे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस उपनिरीक्षक मदेवाड, महिला पोलीस नाईक आघाव, महिला पोलीस शिपाई जगताप यांनी ही बैठक घेतली.
एमआयडीसी परिसरातील महिला कामगार व महिला नोकरदार यांच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ‘बडी कॉप’ नावाचा ग्रुप बनविला आहे. त्या ग्रुपमध्ये महिला पोलीस अधिकारी तसेच महिला पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महिलांचा त्या ग्रुपमध्ये समावेश केला आहे. कोणत्याही महिलेला सुरक्षेबाबत काही अडचण आल्यास त्या ग्रुप वर माहिती टाकल्यास तात्काळ त्यांना पोलीस मदत मिळणार आहे. महिन्यातून एकदा प्रत्येक कंपनीतील महिला कामगार तसेच इतर महिला नोकरदार यांची बैठक घेऊन त्यांच्या सुरक्षेबाबत अडी-अडचणी सोडविल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3