BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : शहर परिसरातील मुख्याध्यापकांसोबत तळेगाव पोलिसांची बैठक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची तळेगाव पोलिसांनी बैठक घेतली. ही बैठक तळेगाव येथील आदर्श विद्यालय येथे आज (सोमवारी) पार पडली.

बैठकीसाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

  • पुढील काही दिवसांमध्ये सण-उत्सव सुरु होणार आहेत. गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी असे अनेक सण-उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्या काळात अनेक गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता असते. शहरातील नागरिकांनी चौकस राहिल्यास अशा घटनांवर अंकुश लावता येईल.

तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलींच्या छेडछाडी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या. तसेच येणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3