Talegaon : पवना नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : आढे (ता. मावळ) गावाच्या हद्दीत पवना नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहत आल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.४५च्या सुमारास उघडकीस आली.

मृत पुरुषाचे वय अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष असून, पांढरा शर्ट व पांढऱ्या रंगाची इजार असा पेहराव आहे. अंदाजे २ ते ३ दिवसापूर्वीच हि व्यक्ती मयत झाली असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती आढेचे पोलीस पाटील सुभाष ठाकर यांनी शिरगाव पोलीस चौकीला दिल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. कोणास या व्यक्तीबाबत अधिक माहिती असल्यास शिरगाव पोलीस चौकीस कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक राहुल गायकवाड हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.