Talegaon : मावळ मधील डॉ. पाटील कॉलेजमधील साफसफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी रुजू करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज  – वराळे  येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज येथील साफसफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी कामावर रुजु करण्यात यावी अशी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, मावळ येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अॅण्ड हिंदी स्कूल ऑफ एक्सलन्स ज्यु. कॉलेजमध्ये साफसफाई करणा-या महिलांना काही दिवसांपासून कामावरुन काढण्यात आले आहे.  कामावर घेताना या महिला साफसफाई कर्मचा-यांना कायमस्वरुपी रुजु करुन घेण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्या साफसफाई कर्मचा-यांना मानसिक त्रास दिला जात आहे. मॅनेजमेंट व कोणत्याही इतर कर्मचा-यांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जाणार नाही याची शाश्वती पत्र मॅनेजमेंट द्यावे. या साफफाई कर्मचा-यांंना पुन्हा कामावर रुजु करुन घ्यावे अशी ही मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.