BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : मकर संक्रांतीनिमित्त शिरगाव पोलीस चौकीत रंगला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शिरगाव पोलीस चौकीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम रंगला. यामध्ये शिरगाव पोलीस चौकीतील महिला पोलीस, पोलिसांचे कुटुंबीय आणि परिसरातील महिला सहभागी झाल्या.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी महिलांचा आवडता सण मकर संक्रांती झाली. मात्र, पोलीस बंदोबस्तामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना या सणात सहभागी होता येत नाही. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मकर संक्रांतीचा सण साजरा करावा. या उद्देशाने परिसरातील महिलांनी शुक्रवारी (दि. 24) शिरगाव पोलीस चौकीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला.

शुक्रवारी दुपारी तीन ते साडेपाच या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. पोलीस चौकीच्या हद्दीतील महिला, महिला पोलोस कर्मचारी आणि पोलिसांच्या कुटुंबातील महिला सदस्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या. महिला पोलीस पाटील, दक्षता समिती महिला अशा एकूण सुमारे 250 महिलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like