Talegaon : घराच्या वाटणीवरून वृद्धाला गज आणि काठ्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – घराच्या वाटणीच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका वृद्ध नागरिकाला गज आणि काठ्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी इंदोरी येथे घडली.

दत्तात्रय भेगडे (रा. शेलारवाडी, ता. मावळ) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश दत्तात्रय भेगडे (वय 33) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अमर सुदाम भेगडे, प्रताप सुदाम भेगडे, सुदाम विठ्ठल भेगडे (सर्व रा. शेलारवाडी ता. मावळ) आणि अन्य दोन अनोळखी ईसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आणि आरोपी यांच्यामध्ये घराच्या वाटणीवरून भांडण झाले. या भांडणात आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना शिवीगाळ आणि दमदाटी करत लोखंडी गज आणि काठ्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे वडील जखमी झाले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.