Talegaon : तळ्यात पोहण्याचा मोह बेतला जीवावर

एमपीसी न्यूज : – तळ्यात पोहण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मित्रांसोबत तळ्याकाठी फिरायला आल्यानंतर तरुण पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. आपला मित्र डोळ्यादेखत पाण्यात बुडाला मात्र तळ्याकाठी उभा असलेल्या मित्रांना काहीही करता आले नाही. ही घटना गुरुवारी (दि. 23) सायंकाळी तळेगाव स्टेशन येथे घडली. तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात (Talegaon)आला.

अनिकेत घनश्याम तिवारी (वय 18, रा. तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. रायपूर, छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिकेत तळेगाव दाभाडे येथे शिक्षणाच्या निमित्ताने राहत होता. गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तो दोन मित्र आणि एका मैत्रिणीसोबत तळेगाव दाभाडे येथील डी-मार्ट मध्ये खरेदीसाठी गेला होता. तत्पूर्वी चारही मित्र जवळच असलेल्या तळ्याकाठी फिरण्यासाठी गेले. तळ्यामध्ये बोटिंग करण्याची सर्वांची इच्छा असल्याने ते बोटिंग क्लबजवळ गेले. मात्र गुरुवारी बोटिंग क्लब बंद होते. त्यामुळे चौघेही निराश झाले. बोटिंग क्लब जवळच फिरत असताना अनिकेत पाण्यात उतरला. त्याचे मित्रही पाण्यात(Talegaon) उतरले.

अनिकेत नव्यानेच पोहायला शिकला होता. स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा त्याला अनुभव होता. त्यामुळे त्याला तळ्यामध्ये पोहण्याचा मोह झाला. म्हणून तो खोल पाण्यात जाऊ लागला. मात्र पोहत असताना त्याचे पाय टेकले नाहीत. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. हा संपूर्ण प्रकार त्याच्या मित्रांच्या डोळ्यासमोर घडत होता. आपला मित्र बुडत आहे हे पाहिल्यानंतर मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. नागरिकांना मदतीसाठी बोलावले. तोपर्यंत अनिकेत पाण्यात बुडाला होता. मित्रांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, अग्निशमन दल आणि आयएनएस शिवाजी येथील भारतीय नौदलाचे एक पथक दाखल झाले.

Hinjawadi : पासवर्ड सेट करण्याच्या बहाण्याने तरुणीला 80 हजारांचा गंडा

गुरुवारी सायंकाळी बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू करण्यात आला सायंकाळी साडेसात पर्यंत शोध पथकाच्या हाती काही लागले नाही अनिकेतचे मित्र घाबरले असल्याने त्यांना नेमके ठिकाण सांगता येत नव्हते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता शोध मोहीम पुन्हा सुरू झाली नमस्ते पावणे आठ वाजताच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, गणेग गायकवाड, गणेश सोंडेकर, गणेश ढोरे, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, ताहीर मुमीन, श्रीसंत भेगडे, कुणाल दाभाडे, शुभम काकडे, सर्जेस पाटील, शेखर खोमणे, धीरज शिदे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल व आयएनएस शिवाजी येथील जवानांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share