Talegaon : पादचारी महिलेची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून 26 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी सहाच्या सुमारास मारुती चौक तळेगाव दाभाडे येथे घडली.

सिंधू द्वारकानाथ निळकंठ (वय 62, रा. रेणुका कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सिंधू तळेगाव येथील मारुती चौकातून पायी जात होत्या. त्या जनावरांच्या रुग्णालयाजवळ आल्या असता एका पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि सहा ग्रॅम वजनाचे गंठण असे एकूण 70 हजार रुपये किमतीचे 26 ग्रॅम सोने जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.