BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : तीन कामगारांनी लांबवले साडेतेरा लाखांचे ब्रॉन्झ धातूचे ब्रश

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये काम करणा-या तीन कामगारांनी कंपनीमधील ब्रॉन्झ धातूचे 13 लाख 66 हजार 810 रुपये किंमतीचे 311 ब्रश लांबवले. हा प्रकार कंपनीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तिघांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शंकर वेवाडे (रा. तळेगाव दाभाडे), सुधीर धोजगे (रा. आंबी) आणि लक्ष्मण गायकवाड (रा. वराळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी स्टोरेज इन्चार्ज तुषार जालिंदर शिंदे (वय 31) यांनी फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे गावाच्या हद्दीत एल अँड टी डिफेन्स कंपनीचे स्टोअर आहे. या स्टोअरचे इन्चार्ज म्हणून तुषार शिंदे काम पाहतात. ऑक्टोबर 2018 ते मे 2019 या कालावधीत स्टोअरमध्ये काम करणा-या तीन आरोपी कामगारांनी कंपनीच्या मागच्या गेटमधून ब्रॉन्झ धातूचे 13 लाख 66 हजार 810 रुपये किमतीचे 311 ब्रश लांबवले.

हा सर्व प्रकार कंपनीमधील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. त्यानुसार तुषार शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवला.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3