BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : फॅशन डिझाईनच्या क्लासमधून शिलाई मशीनची चोरी

209
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – फॅशन डिझाईनच्या क्लासमधून पाच शिलाई मशीन आणि एक मोबाईल फोनची चोरी झाली. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी नऊच्या सुमारास चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

निकिता रवींद्र जाधव (वय 28, रा. म्हाडा कॉलनी, मोहन नगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकिता जाधव यांचा तळेगाव दाभाडे येथे चाकण रोडवर फॅशन डिझाईनिंगचा क्लास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री आठ वाजता क्लास बंद केला. दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी क्लासच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. क्लास मधील पाच शिलाई मशीन आणि एक मोबाईल फोन असा एकूण 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास उघडकीस आली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3