BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेल्यानंतर चोरटयांनी घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कुटुंब नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून दोन लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री एकविरा सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

काळुराम पर्वती गुंजाळ (वय 45, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी काळुराम यांच्या मामाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी काळुराम यांचे संपूर्ण कुटुंब गेले होते. अंत्यविधीवरून रात्री अकराच्या सुमारास सर्वजण परत आले असता बेडरूममधील कपाट उचकटलेले दिसले.

काळुराम यांच्या पत्नीने कपाटात बघितले असता सोन्याचे गंठण, डोरले, अंगठ्या आणि रिंगा असे एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचे दागिने आणि 85 हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2