Talegaon : अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलून तसेच तिने आपल्याशी बोलावे यासाठी सोशल मीडियावर मुलीच्या मैत्रिणींना व भावला मेसेज करून मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी धमकी देणा-या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे परिसरात घडला.

समीर अरुण रणपिसे (वय 22, रा. काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत आरोपी समीर याने फिर्यादी अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग केला. जबरदस्तीने तिला आपल्यासोबत बोलण्यास भाग पाडून तिचे फोटो काढले. समीर याने फिर्यादी मुलीला मारहाण केली.

मुलीने आपल्याशी बोलावे यासाठी त्याने मुलीच्या मैत्रिणी आणि भावाला इंस्टाग्राम वरून मेसेज केले. ‘तिला बोलायला सांगा नाहीतर तिचे फोटो व्हायरल करेल. तिला मारून टाकेन’ अशी धमकी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.