Talegaon : कुटुंबाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पती-पत्नी आणि त्यांची मुलगी यांना मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 10 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली.

साहेबराव पुंडलिक पाटील (वय 42, रा. सुदवडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश कैलास खोसे आणि त्याचे तीन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव, त्यांच्या पत्नी प्रतिभा आणि मुलगी भाग्यश्री यांना आरोपींनी चापटा, बुक्क्यांनी मारून जखमी केले. तसेच आरोपी सतीश याने फिर्याद साहेबराव यांना बॅटने मारून जखमी केले.

तसेच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.