_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon : तळेगावात बुधवारपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन – ग्रामस्थांचा निर्णय

Three days lockdown in Talegaon from Wednesday - decision of villagers

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व व्यवहार बुधवार (दि. 1 जुलै) ते शुक्रवार ( दि. 3 जुलै) या कालावधीत शहर बंद ठेवण्याचा निर्णय आज, सोमवारी सायंकाळी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर आणि तळेगाव स्टेशन येथील श्री मारूती मंदिर येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. तळेगाव स्टेशन येथे श्री हनुमान मंदिर व गाव भागात श्री डोळसनाथ महाराज मंदिर या ठिकाणी ही बैठक पार पडली.

यावेळी सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी, किराणा, ज्वेलर्स, औषध, भाजीपाला, आदि प्रमुख व्यापारी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे गावातील प्रमुख राजकीय, सामाजिक, व्यापारी व इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळीने तळेगाव शहरात वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना व्हावी म्हणून दि. 1 ते दि. 3  जुलैपर्यंत तळेगाव शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये तळेगावमध्ये वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावरील उपाय योजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यासाठी दि. 1 ते दि. 3   जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व बंद राहील असे ठरविण्यात आले. यामध्ये दूध, मेडिकल व दवाखाने चालू राहतील.

तसेच किराणा, भाजीपाला, बँका व सार्वजनिक वाहतूक या सुविधा पूर्णपणे बंद राहतील. तसेच दि. 4  व दि.  5  रोजी दुकाने सकाळी 9  ते सायंकाळी 5  वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येईल. पुढील नियोजन 5 तारखेला सांगण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.

मंगळवार दि. 30 जून रोजी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करून तीन दिवस घराबाहेर न पडता संपूर्ण तीन दिवसांच्या बंदला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.