Talegaon: तळेगाव नगरपरिषदेच्या शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

Talegaon: Three students of Talegaon Municipal Council school in merit list of scholarship examination या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक 12 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 3, 4 आणि 6 मधील अनुक्रमे रत्नदीप चौरे, खुशी प्रसाद आणि आकांक्षा काळे या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

रत्नदीप चौरे, खुशी प्रसाद आणि आकांक्षा काळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वार्षिक 12 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.

या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळा क्रमांक 3, 4 आणि 6 मधील शिक्षक अनुक्रमे अविनाश खुणे, विजया दांगट आणि हर्षाली निबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक केशव चिमटे, संजय चांदे आणि किसन केंगले यांनी तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संपत गावडे यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे हे नगरपरिषदच्या शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना संपत गावडे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<