Talegaon : विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

याप्रकरणी शिवांकुर गिरीश खेर (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. : Two arrested for transporting unlicensed animals

एमपीसी न्यूज – विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

भरत दिनेश तुमकर (वय 28), चंद्रकांत परशुराम सुतार (वय 38, रा. आडे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी शिवांकुर गिरीश खेर (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 5) दुपारी बारा वाजताच्या सुमारास एमएच 14 / जीडी 3217 हा टेम्पो वडगावकडून तळेगावकडे जात होता.

तळेगाव स्टेशन येथे टेम्पो आला असता फिर्यादी यांनी टेम्पो थांबवला. टेम्पोमध्ये गीर जातीच्या दोन गायी होत्या. दोन्ही गायींना जखडून बांधल्याने त्या जखमी झाल्या होत्या.

फिर्यादी यांनी गायींना सोडण्याची विनंती केली. तसेच जनावरे वाहून नेण्याचा परवाना आहे का, अशी चौकशी केली. त्यात आरोपी विनापरवाना जनावरांची वाहतूक आणि विक्री करत असल्याचे आढळून आले.

त्यावरून त्यांच्याविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवणे अधिनियम कलम 11 (1) (ड) (ई) नुसार गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.