Talegaon : शिरगावातील दोन दारू भट्ट्या उध्वस्त; तळेगाव पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – शिरगावातील पवना नदीच्या काठावर असलेल्या दारू निर्मितीच्या भट्ट्यांवर तळेगाव पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी दोन दारू भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. ही कारवाई आज (सोमवारी) दुपारी पाचच्या सुमारास शिरगाव येथे करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगावातील नदी किनारी दारू भट्ट्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा आणि तळेगाव पोलिसांनी दारू भट्ट्यांवर छापा मारला. करवाईमध्ये दोन दारूभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

  • सुमारे 200 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस आल्याचे समजताच संबंधितांनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे. त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तळेगाव पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.

या कारवाई दरम्यान दारू भट्ट्यातील रसायनमिश्रित पाणी नदीत गेल्याने पवना नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.