रविवार, जानेवारी 29, 2023

Talegaon News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी 2 उदमांजराच्या पिल्लांना केले रेस्क्यू

एमपीसी न्यूज : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी (Talegaon News) कंपनीत अडकलेल्या 2 उदमांजराच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर वन विभाग व वन्यजीव रक्षकांनी या पिल्लांना त्यांच्या आईकडे सोडण्याचा निर्णय घेतला.

19 जानेवारी  रोजी सोमाटणे फाटा येथील ओमकार कंपनी मधून पवन दंदेल यांनी 2-3 उदमांजर कंपनी च्या बाथरूम मध्ये आहेत आणि त्यांना बाहेर जायला जमत नाहीत आशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली. तसेच वेळ न घालवता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य संतोष गोपाळे, जिगर सोलंकी आणि झाकीर शेख हे कंपनी मध्ये पोहचलो. कंपनीच्या बाथरूम मध्ये त्यांना उदमांजराची 2 पिल्लं दिसली. त्यांना बाहेर जायला जमत नव्हते त्या मुळे त्या पिल्लांना सुरक्षित पकडून यांची माहिती वडगांव वनविभाग चे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे यांना दिली.

Pune News : सूर सरिता संगीत महोत्सवात रसिकांना सुरेल गायन अन्‌‍ बहारदार वादनाची अनुभूती

त्या पिल्लांची आई तिथे बाहेर फिरत असताना दिसली. (Talegaon News) तरी पिल्लांची प्राथमिक तपासणी करून पिल्लांना त्याच्या आई कडे सोडण्याचा निर्णय वन विभाग व वन्यजीव रक्षकांनी घेतला. कंपनीच्या कर्मचार्यां मध्ये जनजागृती करून लगेच पिल्लांना  आईकडे सोडण्यात आले.

Latest news
Related news