Talegaon: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Talegaon: Two killed in unidentified vehicle collision भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिली. यामध्ये शेख आणि कुरेशी हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज- भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.23) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडला.

शेख अब्बास मेहमूद मौला अली (वय 30, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई), अबू बकर कुरेशी (वय 35, रा. साकीनाका, मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय हनुमंत मुर्हे (वय 27, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मृत शेख आणि कुरेशी हे पिकअपमधून (एमएच 48 एजे 4634) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात होते.

त्यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिली. यामध्ये शेख आणि कुरेशी हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहनचालक पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.