Talegaon : भर रस्त्यात उभा केलेल्या कंटेनरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भर रस्त्यात कंटेनर उभा केला. रात्रीच्या वेळी कंटेनरच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावणे आवश्यक होते. मात्र, चालकाने रिफ्लेक्टर लावले नाहीत. यामुळे अंधारात कंटेनरला मागून धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर कॅटबरी पुलावर घडली.

अमित विक्रम शिंदे (वय 26, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

  • याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नदीप शिवनदास जांभुळकर (वय 31, रा. कवडी, ता. आबगाव, जि. गोंदिया) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नदीप कंटेनरचालक आहे. तो तळेगाव-चाकण रोडने कंटेनर (एमएच 40 / एन 7492) घेऊन जात होता. कॅटबरी पुलावर आला असता कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्याने कंटेनर भर रस्त्यावर उभा केला. चोवीस तासापेक्षा अधिक कालावधीपर्यंत त्याने कंटेनर एकाच जागेवर उभा केला.

  • रात्रीच्या वेळी कंटेनरच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावणे बंधांकर असताना त्याने रिफ्लेक्टर लावले नाहीत. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अमित त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / एएच 477) तळेगाव-चाकण रोडने जात होते.

इंदोरी गावाजवळ कॅटबरी पुलावर अमित यांना कंटेनर न दिसल्याने त्यांची कंटेनरला मागून धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमित यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.