Talegaon : राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या मध्यस्थीने आयआरबी कंपनीतील देखभाल आणि दुरुस्ती कामगारांचे उपोषण मागे

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावरील आयआरबी कंपनीतील देखभाल आणि दुरुस्ती विभागाच्या १७९ कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. महाराष्ट्र राज्याचे कामगार राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या मध्यस्थीने हे कामगारांचे उपोषण मागे घेण्यात आले.

राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी या आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन उपोषण मागे घेतले. राज्य सरकार कामगारांच्या पाठिशी असून व सर्व कामगारांची बाजू राज्य सरकार कडे ठामपणे मांडणार असून लवकरच आयआरबी कंपनीतील कामगारांचे शिष्ठमंडळ सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार आहे, अशी माहिती कामगार राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.