Talegaon : इंदोरी मावळ येथे आढळला अनोळखी मृतदेह

एमपीसी न्यूज – इंदोरी मावळ येथील भंडारा डोंगर पायथ्या शेजारील वनक्षेत्रामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी (दि. 9) दुपारी 2 च्या सुमारास आढळला. वनक्षेत्रामधील झाडाच्या फांदीला तो मृतदेह लटकलेल्या स्वरूपात आढळला. मृतदेह कुजल्याने याची ओळख अदयाप पटलेली नाही.

याबाबत माहिती वनरक्षक काळुराम कोंडिबा कड यांनी तळेगाव एमआईडीसी पोलिसांना दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, एपीआय साधना पाटील, तळेगाव एम आई डी सी पोलीस व पोलीस पाटील जयदत्त शिंदे घटनास्थळी पोहचले असता प्रथम दर्शी मृतदेह हा पुरुष जातीचा आहे हे समजले. हा मृतदेह मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्या मृतदेहाचे वय अंदाजे 50 ते 55 असावे, असे डॉ प्रवीण कानडे यांनी सांगितले.

मृतदेहाजवळ कोणताही पुरावा आढळला नाही. मृत व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ भेटली असून मृत व्यक्ती वारकरी असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा पुढील तपास तळेगाव एमआईडीसी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.