Talegaon : उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्यावतीने माध्यमिक शाळांना सॅनिटायझर कॅन वाटप

या कार्यक्रमात मुख्याध्यापक संघातर्फे नवीन समर्थ विद्यालयाचे शिक्षक विवेक भगत यांचा 'वृक्षमित्र पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. :Vaishali Dabhade distributes sanitizer cans to secondary schools

0

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडून मावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या माध्यमिक शाळांना सॅनिटायझर कॅन वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

नवीन समर्थ विद्यालयामध्ये आज शनिवार (दि. 1) हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांच्या तर्फे संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांच्याकडे सॅनिटीझर कॅन सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका संगीता शेळके, मंगल भेगडे, शालेय समितीचे अध्यक्ष महेश शाह, समर्थ शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, माजी मुख्याध्यापक सोनबा गोपाळे,  मुख्याध्यापक बाळासाहेब उभे, भगवान शिंदे, प्रकाश शिंदे, नारायण पवार, रमेश अरगडे, विठ्ठल माळशीकर,  राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षा शैलजा काळोखे, तालुका सरचिटणीस वीणा करंडे,  शहर अध्यक्षा सुनीता काळोखे, शहर उपाध्यक्षा ज्योति शिंदे, शहर युवती अध्यक्षा निशा वैभव पवार, युवती उपाध्यक्षा शिवानी सोनवणे, ओबीसी शहर अध्यक्षा विद्या भोसले, सरचिटणीस अदिती सोरटे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक संघातर्फे नवीन समर्थ विद्यालयाचे शिक्षक विवेक भगत यांचा ‘वृक्षमित्र पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

सुत्रसंचालन सोनबा गोपाळे यांनी केले. आभार पर्यवेक्षक बाबाराव आंभोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कसाबी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like