Talegaon : वैष्णवीने अपंगत्वावर मात करत ‘दहावी’त मिळवले यश

पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील कु. वैष्णवी अनंत हुलावळे या विद्यार्थिनीने अपंगत्वावर मात करत दहावी (एसएससी बोर्ड) मार्च 2019 या झालेल्या परीक्षेत 86.20 टक्के मिळवले. याबाबत तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वैष्णवीचे दोन्ही पायांचे नर्व्हस ब्लॉक झालेमुळे इयत्ता दुसरीमध्ये असताना तिला अपंगत्व आले. त्यानंतर त्यामुळे तिला सातवीपर्यंत शाळेत जाता आले नाही. आई-वडिलांनी तिला चालत यावे, म्हणून खूप पैसे खर्च करून दवाखाना केला.

  • त्यानंतर वैष्णवी वॉकरच्या साहायाने चालू लागली शिक्षण घायचे, ही जिद्द असल्याने तिने थेट इयत्ता आठवीला कांतीलाल शाह इंग्लिश मेडीयम स्कूल तळेगाव स्टेशन येथे प्रवेश घेतला.

प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन दहावीमध्ये तिने घवघवीत यश मिळवले. यामध्ये कोणतीही खासगी शिकवणी लावली नाही. शेजारी राहणाऱ्या तृप्ती जिर यांनी तिच्या गणित विषयाची तयारी चांगली करून घेतली. त्यामुळे तिला इयत्ता दहावी परीक्षेत चांगले यश मिळाले.

  • तिच्या या यशामध्ये कांतीलाल शाह शाळेतील तिचे सर्व शिक्षक आई-वडील, भाऊ यांचा मोठा वाटा आहे. अपंगत्ववर मात करत जिद्दीच्या जोरावर आणि प्रचंड मेहनत घेऊन यश संपादन केले.

त्यामुळे तिचे तळेगाव परिसरात कौतुक होत आहे. पुढे शिकण्याची तिची प्रचंड इच्छा असून कॉमर्समध्ये तिला आपले करियर करायचे आहे. वैष्णवीच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील इलेक्टरीशीयन आणि आई गृहिणी आहे. भाऊ शिक्षण घेत आहे. त्यामुळे तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.