BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : शहरात भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनानिमीत्त तळेगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिरावला टेम्पल ट्रस्टच्या वतीने तळेगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये लहान मुले विविध वेशभूषा करून सहभागी झाली होती. शोभायात्रेमध्ये इन्द्र्ध्व्ज, चांदीचा रथ, पालखी आणि पारंपारिक वाद्य होते. तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

याचबरोबर प.पू.गुरुदेव देवकीर्ती गुरुमाहारज यांचे प्रवचन झाले. मुख्य विश्वस्त अशोक ओसवल, नितीन शाह, सुरेश दोशी व विनोद राठोड यांनी आयोजन केले होते.

  • जैन सोशल ग्रुप आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने व गरवारे ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान तसेच हिमोग्लोबिन चाचणी शिबिर घेण्यात आले. यावेळी 52 रक्त्दात्यानी रक्तदान केले तर, 280 लोकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. ग्रुपचे अध्यक्ष संजय ओसवल यांनी स्वागत केले तर, दिनेश शाहा यांनी प्रास्ताविक केले.

प्रथम रक्तदान करण्यात आलेल्या 12 जणांना समीर ओसवल यांच्यातर्फे चांदीचे शिक्के भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन राजु शाह, निलेश जैन,हितेश राठोड, घनश्याम राठोड,राकेश ओसवल, भरत राठोड व इंदर ओसवल यानी केले तर, सूत्रसंचालन प्रकल्प प्रमूख किरण ओसवल यानी केले.

  • गरवारे ब्लड बँकेच्या वतीने डॉ. विजयकुमार पवार यांनी जैन सोशाल ग्रुप सलग 22 वर्ष हा उपक्रम घेतल्या बद्दल गौरोवोद्वार काढले.
    डॉ. गणेश पाटिल, डॉ. राज दोशी, डॉ. सुप्रिया बिरवाटकर, रथ सालेर, देवीदास मराठे गणेश दळवी यानी सहकार्य केले, असे प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A4

.