Talegaon : टाकवे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विकास असवले तर, उपाध्यक्षपदी गणेश मोरे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – टाकवे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विकास बंडु असवले आणि उपाध्यक्षपदी गणेश जांलिदर मोरे यांची बिनविरोध निवड झाली.

मावळते अध्यक्ष अनंता असवले आणि उपाध्यक्ष गुलाब परदेशी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी हि निवडणूक घेण्यात आली.

  • अध्यक्ष पदासाठी विकास असवले आणि उपाध्यक्ष पदासाठी गणेश मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्हि. पी. कोतकर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सचिव मदन आडिवळे यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.

यावेळी देखरेख संघाचे चेअरमन संभाजी टेमगीरे, संचालक अनंता असवले,गुलाब परदेशी,दत्तात्रय घोजगे, महादु गुणाट,दत्तात्रय मालपोटे, चंद्रकांत वाघमारे, मारुती असवले, दिलिप आंबेकर आदी मान्यवर संचालक उपस्थित होते. मावळ तालुका भाजपअध्यक्ष प्रशांतआण्णा ढोरे, ॲड. स्वामी फुगे, विनायक दळवी आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.