Talegaon: विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूलने फीवाढीचा निर्णय घेतला मागे, प्रदीप नाईक यांच्या मागणीला यश

Vishwakarma Empress International School decides to increase fees back - Pradip Naik's demand succeeds. विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल'ने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के फी वाढीचा निर्णय घेतला होता.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूलने घेतलेला 15 टक्के फी वाढीचा निर्णय मागे घेतला असून   हा निर्णय मागे घेण्यासाठी निरंतर पाठपुरावा करणाऱ्या प्रदीप नाईक यांच्या मागणीला यश आले आहे.

विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल’ने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के फी वाढीचा निर्णय घेतला होता. ही वाढलेली फी भरण्यासाठी पालकांवर वारंवार दबाव आणला जात होता. मात्र, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या निर्णयाला विरोध करत शाळेला ही वाढ मागे घेण्याची मागणी केली होती.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पुण्याचे शिक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे या शाळेवर कारवाई करण्याची अथवा फी वाढीचा निर्णय मागे घेण्याबाबत आदेश देण्याची पत्राद्वारे मागणी नाईक यांनी केली होती.

दरम्यान, शाळेने फी वाढीचा निर्णय मागे घेतला असून नाईक यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सुहास काळोखे या तळेगाव दाभाडे येथील पालकांनी प्रदीप नाईक यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. पालकांना भेडसावणाऱ्या मोठ्या समस्येचे निराकरण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहेत.

प्रदीप नाईक यांनी यापुढेही समाजकल्याणासाठी काम करत राहण्याची ग्वाही दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like