Talegaon : सुदुंबरेच्या उपसरपंचपदी विश्वनाथ आंबोले बिनविरोध

Vishwanath Ambole unopposed as Deputy Panch of Sudumbare : सुदुंबरेच्या उपसरपंचपदी विश्वनाथ आंबोले बिनविरोध

एमपीसीन्यूज – सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ उर्फ बाळा आंबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायतीचे उपसरपंच ताराचंद गाडे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेवर सरपंच सुनीता गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत विश्वनाथ आंबोले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती माळी यांच्याकडून उपसरपंचपदी आंबोले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली.

यावेळी मावळते उपसरपंच ताराचंद गाडे, ग्रामपंचायत सदस्य, उमा शेळके, मिनीता गाडे, कांता गाडे, मोनाली दिवेकर, चंद्रभागा कडूसकर, प्रवीण गाडे, लक्ष्मण भांगेसह माजी सरपंच माणिक गाडे, माजी उपसरपंच जालिंदर गाडे, माजी उपसरपंच मोहन काळडोके, सुरेश गाडे, राजेंद्र गाडे, बापू दरेकर, माजी चेअरमन सोपान गाडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबोले यांचा शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच माणिक गाडे व माजी उपसरपंच जालिंदर गाडे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.